Breaking News ठरले ! एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नाव ठरले ? हे असणार बंडखोर आमदारांच्या गटाचे नाव ?

487 0

गुवाहाटी- एकनाथ शिंदे यांच्या बंदमुळे महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची टांगती तलवार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर एक मोठी घडामोड समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाचे अधिकृत नाव निश्चित केल्याची माहिती समोर आली आहे. ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ असे या गटाचे नाव असणार आहे असेही समजते. मात्र अजून या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील ४० आमदारांनी बंडखोरी करत पक्षालाच आव्हान दिल्याचं गेल्या काही दिवसांत दिसून आलं आहे. आता हा गट अधिक आक्रमक झाला असून या गटाचे नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाचे नाव निश्चित केले आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरे असे या गटाचे नाव असणार आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या दिशेनं एकनाथ शिंदे गटाची वाटचाल सुरू झाल्याचं दिसून येत आहे.

या नावामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळे या नावावर शिवसेनेकडून कायदेशीर आक्षेप घेतला जाण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकारला घरघर लागल्याचेही बोलले जात आहे.

Share This News
error: Content is protected !!