काळी जादू आणि टोपलीभर लिंबू, मिरच्या; ‘वर्षा’ बंगल्यावरून अंधश्रद्धेचं राजकारण ?

2081 0

राज्यात महायुतीचं सरकार येऊन दोन महिने झाले मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे कुटुंबीय हे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर राहायला गेले नाहीत आणि यावरूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाहीत. यावरून नेमके काय वार पलटवार सुरू आहेत. वर्षा बंगला हे मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान आहे.मुख्यमंत्री म्हणून वर्षा बंगल्यावर राहायला जावं असं प्रत्येक नेत्यांचं स्वप्न असतं. वर्षा बंगला ही एक प्रतिष्ठा आहे. या बंगल्याला राजकीय इतिहास आहे. मात्र याच वर्षा बंगल्यावरून सध्या राजकीय चर्चा सुरू आहे. खासदार संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदावर बसून दोन महिने झाले तरीही वर्षावर राहायला का जात नाहीत.आता संजय राऊत यांनी केलेले हे विधान आणि त्यावर रामदास कदम यांनी केलेला पलटवार यावरून चर्चेला उधाण आलंय. महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात महत्त्वाची वास्तू ही वर्षा बंगला आहे. राज्याशी संबंधित महत्त्वाचे निर्णय, राजकीय कटकारस्थान, मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित विविध क्षण या सगळ्यांचा साक्षीदार हा बंगला आहे. काही झालं की वर्षावर खलबतं होतात. राज्याच्या राजकारणात वर्षा बंगला हा नेहमी पॉवर पॉईंट राहिला आहे. मात्र आता याच वर्षा बंगल्यावरून अंधश्रद्धेच राजकारण पाहायला मिळतंय.

Share This News
error: Content is protected !!