Kirit somayya

भाजप नेते किरीट सोमय्या राज्यपालांची भेट घेणार

479 0

मुंबई- मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणणारचं असा निर्धार केलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना खार पोलीसांनी ताब्यात घेत अटक केली होती. त्यांची भेट घेण्यासाठी निघालेले भाजप नेते किरीट सोमय्या यांना मारहाण करण्यात आली. ही मारहाण काही शिवसैनिकांकडून करण्यात आल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता.

या हल्ल्यानंतर पोलीस आपला एफआयआर घेत नसल्याचे म्हणत सोमय्यांनी पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या दिला. त्यानंतर सोमय्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. आपला एफआयआर पोलिसांनी घेतलाच नाही. उलट आपल्या नावाने बनावट एफआयआर दाखल केल्याचा खळबळजनक आरोप सोमय्यांनी केला. इतकेच नाही तर आपली बनावट सही सुद्धा केल्याचं त्यांनी म्हटलं. याच्या विरोधात आज तक्रार दाखल करण्यासाठी किरीट सोमय्या खार पोलीस स्टेशनला पोहोचले. मात्र, पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही.

मारहाण झाल्यानंतर सोमय्या यांनी केंद्रीय गृहसचिव आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद रॉय यांची भेट घेतल्यानंतर आता किरीट सोमय्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. बुधवारी (ता.27 एप्रिल) राजभवन येथे किरीट सोमय्या भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.

Share This News
error: Content is protected !!