मोठी बातमी ! संजय राऊतांची संपत्ती ईडीकडून जप्त

394 0

मुंबई- शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना ईडीने मोठा दणका दिला आहे. ईडीने राऊत यांच्यावर कारवाई करत त्यांचे अलिबागमधील ८ भूखंड, दादरमधील १ फ्लॅट जप्त केला आहे. संजय राऊतांनी मनी लाँड्रिंगमधील पैशातून संपत्ती खरेदी केली असल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली आहे. तसेच, संजय राऊत आणि त्यांच्या जवळील नेत्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

संजय राऊत यांची अलिबाग आणि दादरमधील संपत्ती जप्त केली आहे. जप्त केलेल्या संपत्तीमध्ये अलिबागमधील आठ भूखंड आणि दादरच्या फ्लॅटचा समावेश असल्याची माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर चर्चेत आलेला पत्राचाळ घोटाळा1034 कोटींचा असल्याचे समजते. याप्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना ईडीने यापूर्वीच अटक केली आहे. या प्रकरणी गेल्या आठवड्यात आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. राऊतांच्या मुलींच्या कंपनीत भागीदार असलेल्या सुजित पाटकर यांच्या घरावरही यापूर्वी ईडीने छापेमारी केली होती. शिवाय संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून केलेल्या 55 लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली होती. या प्रकरणी त्यांची चौकशीही झाली. संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधवी राऊत आणि वर्षा राऊत यांच्यात झालेले आर्थिक व्यवहार ईडीच्या रडारवर आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवायांचा सपाटा लावला आहे. महाविकास आघाडीचे अनेक नेते ईडीच्या रडारवर आहेत. त्यावरुन वारंवार विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं होतं. केंद्रात सत्ता असलेलं भाजप केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन बिगर भाजपशासित राज्यांमधील इतर पक्षांच्या नेत्यांना त्रास देत असल्याचा आरोप महाराष्ट्रातील नेत्यांकडून केला जात होता.

संजय राऊत यांनी यापूर्वी थेट ईडीवर आरोप केले होते. ईडीचे मोठे अधिकारी भाजपचे तिकीट घेऊन निवडणूक लढवत आहेत. ज्या ईडी अधिकाऱ्याने निवडणूक लढवली त्याने पन्नास जणांचा खर्चही केलाय. ईडी भाजपची एटीएम मशीन बनली आहे. मी अतिशय जबाबदारीने हे वक्तव्य करतोय. एक्स्टॉर्शनच्या बाबतीतला सगळा कच्चाचिठ्ठा पंतप्रधान कार्यालयाला दिला आहे. असे राऊत म्हणाले होते. या सर्व आरोप राऊतांना भोवले असल्याचे बोलले जात आहे.

Share This News

Related Post

मराठा आरक्षणाचा पुन्हा एल्गार ! मराठा क्रांती मोर्चा, मराठा सेवा संघाच्या बैठकीत एकमतानं निर्णय… पाहा

Posted by - September 15, 2022 0
सोलापूर : मराठा आरक्षणाचा पुन्हा एकदा एल्गार होणार असल्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा मोर्चा, संभाजी ब्रिगेडसह मराठा सेवा…

पिंपरी-चिंचवडमध्ये रात्री कोण कुणासोबत कुठं फिरतंय हे आता अजितदादांना समजणार

Posted by - June 3, 2022 0
पुणे- अजित पवार यांनी भाषणामध्ये टोलेबाजी करायला सुरुवात केली की भल्याभल्यांची भंबेरी उडते. पिंपरी चिंचवडमध्ये विकासकामांच्या उदघाटनासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित…

जिवलग मैत्रिणीने घेतला गळफास,दुसरीने मारली पाचव्या मजल्यावरून उडी; पुण्यातील खळबळजनक घटना

Posted by - September 14, 2022 0
हडपसर : हडपसर येथील शेवाळवाडीमध्ये दोन बाल मैत्रिणींनी आत्महत्या केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली. एकीने गळफास घेतला तर तिला अॅम्बुलन्समधून…

शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील प्रत्येकापर्यंत पोहोचवा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन

Posted by - February 4, 2023 0
पुणे : ग्रामीण भागाचा विकास झाल्यास देशाचा कायापालट घडून येईल. ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. त्यादृष्टीने…

पुणे : तळजाई पठारावरील पस्तीस हजार संघस्वयंसेवकांच्या शिबिराला चाळीस वर्षे पूर्ण

Posted by - January 13, 2023 0
पुणे : पुण्यातील तळजाई टेकडीच्या पठारावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भरवलेल्या ‘प्रांतिक शिबिरा’ला शनिवारी (१४ जानेवारी) चाळीस वर्षे पूर्ण होत आहेत.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *