भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण; शरद पवारांची ‘या’ तारखेला पुन्हा साक्ष नोंदवणार

157 0

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पुण्यातील भीमा कोरेगाव हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या जे. एन. पटेल आयोगासमोर हजर राहण्यासाठी नव्याने समन्स बजावले आहे. येत्या ५ आणि ६ मे रोजी मुंबईतील सुनावणीत हजर राहण्यासाठी पवारांना बजावलेले हे तिसरं समन्स आहे.

१ जानेवारी २०१८ रोजी पुण्यातील कोरेगाव-भीमा येथे घडलेल्या घटनेनंतर राज्यभरात दंगल उसळली होती. पुणे जिह्यात घडलेल्या भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयकडे सोपवला असला तरी राज्य सरकरातर्फे चौकशी आयोगाचे कामकाज निवृत्त न्यायमूर्ती जे.एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील समितीपुढे सुरूच आहे.

पवारांनी माध्यमांत केलेल्या काही विधानांवरून या घटनेसंदर्भात पवारांकडे यासंदर्भातील काही अधिकची माहिती उपलब्ध असण्याची शक्यता असल्याचं त्यांनी आपल्या अर्जात नमूद केले होते. त्याची दखल घेत आयोगानं शरद पवार यांना २३ आणि २४ फेब्रुवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठवले होते. त्यापूर्वी ४ एप्रिल २०२१ ला शरद पवारांना आयोगापुढे साक्ष देण्यासाठी हजर राहण्याचे समन्स जारी केले होते. मात्र, काही कारणास्तव ते हजर राहू शकले नव्हते.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!