पुणे- लग्नाचं आमिष दाखवून महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक भारत देसडला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारत देसडला हे हे पंजाबच्या घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते.
या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात देसडला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेने भारत देसडला यांच्यावर केला आहे. भारत देसडला हे घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. देसडला यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने साहित्य क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.