मुंबई- महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यामधील बेबनावाचे अनेक किस्से आजपर्यंत समोर आले आहेत. पण राजकारण आणि वैयक्तिक जीवन यांच्यात फरक असतो. याचा प्रत्यय राजभवनात पाहायला मिळाला.
आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा वाढदिवस आहे. या निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांना पुष्पगुच्छ व शाल देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.