BEAUTY TIPS : प्रत्येक तरुणीच तिच्या सौंदर्याकडे विशेष लक्ष असतं हात आणि पायाची नको ही मोठी सुंदर दिसावी यासाठी आज बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अनेक जणी नेल आर्ट देखील करण्यामध्ये विशेष रस घेतात पण अर्थात ही सगळी हाऊस पूर्ण करण्यासाठी नखं मोठी वाढणे आणि ती सहज न तुटणे हे देखील महत्त्वाचे असते अनेक महिला नखं वाढत नाहीत आणि अगदीच पातळ वाढतात अशी तक्रार करतात यासाठी आज मी तुम्हाला काही सोप्या टिप्स देणार आहे.
तुम्ही दिवसभरात पाण्यात किती काम करता या अंदाजानुसार तुम्हाला तुमच्या नखांवर मेहनत घ्यावी लागेल. विशेष करून गृहिणींना तुमच्या नखांची काळजी घ्यावी लागणार आहे. कारण सातत्याने साबण पाणी यामध्ये हात राहतात त्यामुळे आणि त्यामुळे नखांचे सौंदर्य खराब होते.
१. नखांची काळजी घेण्यासाठी आठवड्यातून किमान दोन वेळा कोमट पाण्यामध्ये खोबऱ्याचे तेल, अर्धे लिंबू, एक चमचा शाम्पू, आणि एक छोटा चमचा मीठ घाला. यामध्ये तुम्हाला तुमचे हात दहा मिनिटे तरी पूर्णपणे बुडवून ठेवायचे आहेत. पायांवर देखील अशीच पद्धत वापरा दहा मिनिटानंतर लिंबाच्या सालीने नखांना चांगले घासून काढा. यामुळे तुमच्या नखांचे आरोग्य चांगले राहील, नख स्वच्छ होतील, त्यांची वाढ होईल आणि ते सहज तुटणार देखील नाहीत.
२. नखांवर नेहमी हलक्या रंगाचे नेलपेंट लावून ठेवा नेलपेंट नेहमी चांगल्या क्वालिटीचे वापरा.
३. तुम्ही जर गृहिणी असाल तर नखांची लांबी ही फार ही जास्त ठेवू नका. यामुळे घरातील कामे करताना नख तुटण्याची भीती राहते. नख मोठी वाढलेली असतील तरच ती सुंदर दिसतात हा गैरसमज आहे. नखांना स्वच्छ आणि सुंदर शेपमध्ये फाईल करायला शिकून घ्या. आठवड्यातून एखादा दिवस स्वतःसाठी काढून नखांवर छान रंगाचे नेलपेंट लावा. तरीही तुमची नख छान दिसतील आणि छान राहतील.
४. नखांवर जमेल तेव्हा बदामाचे तेल किंवा एरंडेल तेलाने गोलाकार मसाज करा याने नखाचे आरोग्य वाढते.
५. लिंबाच्या सालीने देखील तुम्ही नखांवर मसाज करू शकता. यामुळे देखील खूप चांगला फायदा मिळेल.
६. जमल्यास तीन महिन्याच्या अंतराने तरी पेडिक्युअर मॅनिक्युअर कराच.