BARAMATI ACCIDENT NEWS: बारामतीमध्ये नुकतीच वडील आणि दोन मुलींच्या अपघाताची घटना ताजी असतानाच,
आता बारामती परिसरात पुन्हा एकदा भीषण अपघात घडला.
गुणवडी गावात पाच वर्षीय चिमुकल्याचा
रिक्षाच्या धडकेत मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली..
BARAMATI ACCIDENT NEWS: बारामतीत मालवाहतूक रिक्षाच्या धडकेत चिमुकल्याचा मृत्यू
बारामतीतील वडील आणि दोन मुलींच्या अपघाताची घटना ताजी असतानाच शुक्रवारी गुणवडीमध्ये एक हृदय दावक अपघाताची घटना घडलीये….
घराच्या अवघ्या काही अंतरावर आल्यानंतर माल वाहतूक रिक्षाने धडक दिल्यामुळे एका
पाच वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.अथर्व अभिजीत लोंढे असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे..
अथर्व बारामती वरून आपल्या आजी सोबत रिक्षातून गुणवडी गावात आला..
MUMBAI KANDIWALI CYBER NEWS: मुंबई पोलिसांकडून सायबर रॅकेटचा पर्दाफाश;देशभरात केली 60 कोटींची फसवणूक
रिक्षातून उतरल्यानंतर आजी रिक्षावाल्याचे पैसे देत असताना
हा मुलगा रस्ता ओलांडून पलीकडे घराकडे जाताना एका मालवाहतूक रिक्षाने त्याला जोरदार धडक दिली..
त्यामध्ये अथर्वचा दुर्दैवी मृत्यू झाला,
रिक्षाचालक संदीप बाळासाहेब भागवत यांच्या विरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
असून पुढील तपास बारामती पोलिस करतं आहेत..
BULDHANA CASE: ताटात उष्टं अन्न ठेवल्याने वडिलांचा संताप; रागाच्या भरात मुलाने वडिलांना संपवलं