बंगी जम्प साहसी खेळ खेळणं तरुणाच्या जीवावर बेतलं, मावळ तालुक्यातील घटना

494 0

वडगाव मावळ-बंगी जम्प हा साहसी खेळ खेळणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं. मावळ तालुक्यातील कुसगाव येथे बंगी जम्पच्या लिफ्टमध्ये अडकून प्रवीण दीपक साळवे या 25 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

बंगी जम्प हा अतिशय साहसी खेळ समजला जातो. प्रवीण साळवे हा तरुण मूळचा हडपसर येथील रहिवासी असून तो 15 एप्रिल रोजी बंगी जम्प करण्यासाठी मावळ तालुक्यातील कुसगाव येथील इंडिया बंगी जम्प अ‍ॅडव्हेंचर फोर्ट या ठिकाणी गेला होता. त्या ठिकाणी बंगी जम्प करतेवेळी तो ओपन लिफ्टमधून जात असताना लिफ्टमध्ये सुरक्षा जाळी नसल्यानं त्याचा उजवा हात लिफ्टच्या शिडीत अडकून दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी प्रवीणचे वडील दीपक सखाराम साळवे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर इंडिया बंगी जम्पिंग अ‍ॅडव्हेंचर फोर्टचे मालक आणि चालकाविरोधात तळेगाव दाभाडे पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय.

Share This News
error: Content is protected !!