BANER POLICE STATION ROBBERY CASE:  चोरलेल्या कॅशचं ओझं न झेपल्यानं चोरट्यानं रस्त्यातच तिजोरी फेकून पळ काढल्याची घटना पुण्यात घडली आहे. ही घटना बाणेरच्या यशदा चौकात घडली असून पोलीस ही थक्क झालेत.या चोरी प्रकरणी फॉरेक्स व्यावसायिक रोहित मालुसरे (ROHIT MALUSARE) यांनी फिर्याद दिली.

BANER POLICE STATION ROBBERY CASE: चोरलेल्या नोटांची तिजोरी रस्त्यातच फेकून चोरटा पसार

155 0

BANER POLICE STATION ROBBERY CASE:  चोरलेल्या कॅशचं ओझं न झेपल्यानं चोरट्यानं रस्त्यातच तिजोरी फेकून पळ काढल्याची घटना पुण्यात घडली आहे. ही घटना बाणेरच्या यशदा चौकात घडली असून पोलीस ही थक्क झालेत.या चोरी प्रकरणी फॉरेक्स व्यावसायिक रोहित मालुसरे (ROHIT MALUSARE) यांनी फिर्याद दिली.

बुधवारी सकाळी मालुसरे हे त्यांच्या बालेवाडीतील फॉरेन करन्सी एक्सचेंज ऑफिसमध्ये गेले.

TOP NEWS MARATHI: PUNE ROBBERY CASE: पुण्यातील नारायण पेठेत जादूचे प्रयोग दाखवण्याच्या बहाण्याने चोरी

त्यावेळी ऑफिसमध्ये चोरी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी तातडीने बाणेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

त्यावेळी तातडीने पोलिसांच्या एका पथकाने हे ऑफिस असलेल्या आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज (CCTV VIDEO)  गोळा केले.

त्यामध्येच एक चोरटा मालुसरेंच्या ऑफिसमध्ये जाताना दिसला. त्याने ऑफिसमधील पोहोचून परकीय नोटांनी भरलेली ही तिजोरी उचलली.

वीस लाखांच्या नोटा असल्याने तिजोरी प्रचंड जड होती. त्याला या तिजोरीचं ओझं झेपत नव्हतं. मात्र त्याने मोठ्या कष्टाने ही तिजोरी आपल्या बाईक पर्यंत आणली.

तिजोरी बाईकवर ठेवताना चोरट्याच्या नाकी नऊ आले. तरीही त्याने तिजोरी नेण्याचा प्रयत्न केलाच. अर्थात अवघ्या 300 मीटर पर्यंतही त्याला या तिजोरीचं ओझं झेपलं नाही.

त्यामुळे त्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या झुडपात तिजोरी फेकून पळ काढला.

सीसीटीव्ही पाहताना ऑफिस पासून 300 मीटरवर या चोरट्याकडे तिजोरी होती.

LONAVLA POLICE STATION ROBBERY: मालकाचे हातपाय बांधले, तलवारी नाचवल्या, साडेअकरा लाख लूटले;लोणावळ्यातील आलिशान बंगल्यावर चौथ्यांदा दरोडा

मात्र तिथून पुढे त्याच्याकडे काहीच दिसत नव्हतं. त्यामुळे ही तिजोरी 300 मीटरच्या आतच कुठेतरी असणार असा पोलिसांना संशय आला.

त्यानुसार तपास करताना अगदी सहज ही तिजोरी पोलिसांच्या पथकाला आढळून आली.

ATM CARD ROBBERY PUNE: सावधान! ज्येष्ठ नागरिक एटीएम चोराच्या रडारवर; 14 लाखांची कॅश आणि 166 एटीएम कार्ड जप्त
या प्रकरणातील आरोपीचा बाणेर पोलिसांकडून शोध सुरू आहे.

चोरट्याला या ऑफिसमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आहे याची माहिती कशी मिळाली ?

त्याचा या ऑफिसही काही संबंध आहे का ? त्याने यापूर्वी कधी रेकी केली आहे का ?

या सगळ्याचा तपास पोलिसांकडून सुरू असून आरोपीला पकडण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.

 

Share This News
error: Content is protected !!