निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवली, राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिने कारावासाची शिक्षा

240 0

अमरावती- निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याबद्दल राज्याचे महिला बालकल्याण व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिने कारावासाची शिक्षा आणि 25 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

बच्चू कडू यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई येथील फ्लॅटबाबतची माहिती लपवली होती. याबाबत चांदूरबाजार येथील भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी 2017 मध्ये तक्रार नोंदवली होती. त्यानंतर बच्चू कडू यांच्या या प्रकरणी अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयात सुनावणी सुरू होती. बच्चू कडू यांच्याविरोधात लोकप्रतिनिधी कायदा कलम 125 अ अनवये गुन्हा सिद्ध झाला आहे.

बच्चू कडू हे अचलपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. बच्चू कडू यांच्याकडून या निकालाला हायकोर्टात आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे.

Share This News

Related Post

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा : सांगलीच्या संकेत सरगर यांना वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक

Posted by - July 30, 2022 0
सांगली: इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सांगलीच्या संकेत महादेव सरगर यांनी वेटलिफ्टिंगमध्ये पुरूषांच्या ५५ किलो गटात रौप्यपदक पटकावले…
Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा आरक्षणाविरोधात जयश्री पाटलांकडून हायकोर्टात याचिका दाखल

Posted by - March 1, 2024 0
मुंबई : मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणाचा वाद हाय कोर्टात पोहोचला आहे. राज्य…
Fire

पुण्यातील कल्याणीनगरमधील आयटी पार्कमध्ये भीषण आग

Posted by - May 29, 2023 0
पुणे : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये आयटी पार्कमध्ये भीषण आग लागली आहे. या आयटी पार्कमध्ये 300 कर्मचारी अडकले आहेत. या कर्मचाऱ्यांना बाहेर…

अजित पवारांचा कृषिमंत्री अब्दुल सत्तारांवर गंभीर आरोप; म्हणाले, “अब्दुल सत्तार यांनी 150 कोटी रुपयांची जमीन…!” VIDEO

Posted by - December 26, 2022 0
नागपूर : सध्या राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू असून यामध्ये रोज सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येताना दिसत आहेत. आज नागपूर…
Cyclone

बिपरजॉय चक्रीवादळाबाबत हवामान विभागाकडून मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा

Posted by - June 12, 2023 0
मुंबई : बिपरजॉय चक्रीवादळाबाबत हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे. बिपरजॉय चक्रीवादळ 500 ते 600 किमी दूर असून ते…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *