पुस्तकासाठी बाबासाहेब पुरंदरे स्त्रोत नव्हते – जेम्स लेन

206 0

मनसे विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष राज्यात सध्या सुरु आहे. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. राज ठाकरेंनी ठाण्यात पार पडलेल्या उत्तर सभेत राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सडकून टीका केली.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या लिखाणावरुनही राज ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये मोठा वाद होताना दिसत आहे. एकीकडे राज ठाकरे पुरंदरेंनी घराघरात छत्रपती शिवाजी महाराज सांगत असताना शरद पवार मात्र त्यांनीच जेम्स लेनला वादग्रस्त पुस्तकासाठी माहिती दिली, असा आरोप केला आहे. त्यातच आता स्वत: लेख जेम्स लेनने या वादावर भाष्य केले आहे.इंडिया टुडेनं ई-मेलद्वारे त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत या पुस्तकाबाबत त्यांनी भाष्य केलं असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्या पुस्तकात आपण कुठलाही ऐतिहासिक दावा केला नसून ‘त्या’ पुस्तकासाठी कुणीही माहिती पुरवली नाही, असा दावाच जेम्स लेननं केलाय. तसंच पुस्तक लिहीत असताना बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचंही जेम्स लेननं या मुलाखतीत सांगितलं आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!