महत्वाची बातमी ! आर्यन खानला एनसीबी कडून क्लीनचिट ! आर्यनकडे ड्रग्ज नव्हते, एनसीबीचा खुलासा

188 0

मुंबई- संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणी शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला एनसीबी कडून क्लीनचिट देण्यात आली आहे. आर्यन खानकडे अंमली पदार्थ सापडले नसल्याचे एनसीबीने स्पष्ट केले आहे. आर्यन खानसह एकूण 6 जणांना एनसीबीकडून क्लीन चिट देण्यात आली आहे. या प्रकरणी एनसीबीने विशेष न्यायालयात आपले अंतिम आरोपपत्र दाखल केले आहे. आतापर्यंत एनसीबीने १० व्हॉल्यूमचे ६००० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

कॉर्डेलिया क्रूझवर ड्रग्ज पार्टी प्रकरणाचा एनसीबीने पर्दाफाश केला. याच क्रूझवरुन अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणाला आणखी महत्त्व प्राप्त झाले. या प्रकरणी एनसीबीने एकूण १४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. आर्यन खान आणि मोहककडे ड्रग्ज सापडले नव्हते. चौकशीत ६ आरोपींविरोधात पुरावे मिळाले नसल्याचे एनसीबीने जारी केलेल्या प्रेस नोटमध्ये सांगितले आहे. तसेच या ६ जणांची नावं आरोपपत्रातून वगळ्यात आली आहेत.

एनसीबीने २ ऑक्टोबर २०२१ रोजी आर्यन, अरबाज, इशमत आणि गोमितला इंटरनॅशनल पोर्ट टर्मिनल येथून ताब्यात घेतले. नुपूर, मोहक आणि मुनमुनला कोर्डिला क्रुझवरून ताब्यात घेण्यात आलं. यापैकी आर्यन आणि मोहक वगळता सर्वांकडे ड्रग्ज सापडले.

सुरुवातीला या प्रकरणाचा तपास मुंबई एनसीबीने केला. नंतर ६ नोव्हेंबर २०२१ रोजी या प्रकरणाचा तपास मुंबई एनसीबीकडून काढून एनसीबीच्या विशेष तपास पथकाकडे देण्यात आले. एसआयटीने १४ आरोपींविरोधात तपास केला. तपासात ६ जणांविरोधात पुरेसे पुरावे न मिळाल्याने त्यांचे आरोपपत्रातून नाव हटवण्यात आले.

आरोपपत्रातून वगळण्यात आलेल्या ६ जणांची नावे-

१. आर्यन खान
२. अविन शुक्ला
३. गोपाल आनंद
४. समीर साईघन
५. भास्कर अरोरा
६. मानव सिंघल

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!