मोठी बातमी ! अनिल देशमुख केईएमच्या अतिदक्षता विभागात दाखल, छातीत दुखत असल्याची तक्रार

208 0

मुंबई- १०० कोटी वसुली प्रकरणात सीबीआयच्या कोठडीत असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना छातीत दुखत असल्याच्या कारणावरून केईएम रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. लवकरच त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येईल असे डॉक्टरांनी सांगितले.

सध्या त्यांची स्ट्रेस थिलीयम हार्ट टेस्ट करायची असल्याने त्यांना परळ येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या औषधोपचार आणि प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे, असे रुग्णालयाच्या वतीने कळवण्यात आले आहे.

Share This News
error: Content is protected !!