दुबई- आशा भोसले यांचा मुलगा आनंद बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळले. यामध्ये त्यांना किरकोळ दुखापत झाली. त्यांना तातडीने येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. सध्या आशा भोसले या स्वतः आनंद सोबत आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार काही दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. आनंद अचानक बेशुद्ध पडले. या घटनेमुळे घरातील सदस्य कमालीचे घाबरले. आनंद हे आशा भोसले यांचा धाकटे चिरंजीव आहेत. सध्या ते बरे असून त्यांना जनरल वॉर्डात हलवण्यात आलं आहे. आशा भोसले सध्या मुलासोबतच आहेत.
नुकतीच प्रकृती बिघडली, त्यानंतर त्यांना तातडीने दुबईतील इस्पितळात दाखल करण्यात आले. आनंद अचानक बेशुद्ध पडले आणि जमिनीवर कोसळले. यात त्यांना किरकोळ दुखापत झाली. आनंद यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या ते बरे असून त्यांना जनरल वॉर्डात हलवण्यात आलं आहे. आशा भोसले सध्या मुलासोबतच आहेत.
आशा भोसले यांना तीन मुलं होती. थोरला मुलगा हेमंत भोसले यांचे काही वर्षांपूर्वी कर्करोगाने निधन झाले. हेमंत भोसले यांनी अनेक चित्रपटांसाठी गाणी रचली आणि संगीत नाटक अकादमीपासून फिल्मफेअर आणि २ राष्ट्रीय पुरस्कारही जिंकले होते. अशा भोसले यांची मुलगी वर्षा हिने अलीकडेच २०१२ मध्ये पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली होती. वर्षा या मराठी आणि हिंदी सिनेमांतील प्रसिद्ध पार्श्वगायिका होत्या. २००८ मध्ये वर्षा यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्या बऱ्याच काळापासून डिप्रेशनमध्ये होत्या.