MALEGAO BOMB BLAST एक महत्त्वाचे बातमी समोर आली असून 2008 मध्ये घडलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील
सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली मुंबईतील विशेष NIA न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
VICTIM AKLAK ANSARI ON MALEGAON CASE| जो निकाल आला तो ऐकून दुःख झालं
नेमकं काय घडलं?
29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव शहरातील भिक्खू चौकातील मशिदीजवळ रमजान महिना असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होती.
रात्री नमाज पढल्यानंतर अनेक मुस्लिम नागरिक रस्त्यावर उभे होते.
त्याचवेळी साडेनऊच्या सुमारास एका दुचाकी वर ठेवलेल्या आरडीएक्सचा स्फोट झाला.
यामध्ये 6 निष्पाप मुस्लिम नागरिकांचा मृत्यू तर 101 जण गंभीर जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटात अनेक कुटुंबं उध्वस्त झाली.
रमजानच्या पवित्र महिन्यात हा बॉम्बस्फोट झाल्याने देशभरातून आक्रोश व्यक्त केला जात होता.
या प्रकरणात सुरुवातीला महाराष्ट्र एटीएसने तपास सुरू केला, नंतर 2011 मध्ये तो राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) सोपवण्यात आला.
या प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी यांच्यावर मुख्य आरोप ठेवण्यात आले आहेत. त्याशिवाय काही आरोपी अजूनही फरार आहेत. त्यात रामजी कालसंग्रा, संदीप डांगे, प्रविण तकलकी, शामजी साहू आणि राकेश धावडे यांचा समावेश आहे