अक्षय्य तृतीये निमित्त नागरिकांची सोने खरेदीला पसंती

393 0

अक्षय्य तृतीया हा हिंदू धर्मातील सर्वात शुभ सणापैकी एक सण मानला जातो. त्यामुळे हिंदू धर्मीय या दिवशी मोठ्या प्रमाणात सोने खरेदीसाठी पसंती देतात. आज अक्षय्य तृतीयेनिमित्त नागरिकांची सोने खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी बघायला मिळत आहे.

आज राज्यातच नाही, तर देशभरात सोने बाजारात मोठी उलाढाल पाहायला मिळत आहे. गेल्या दोन वर्षांपासून कारोनाच्या पार्श्वभूमीवर अक्षय तृतीया उत्साहात साजरा करण्यात आली नव्हती. परंतु, या वर्षी मात्र नागरिकांची सोने खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. रमजान ईदनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने नागरिकांना सोने खरेदी करण्यासाठी वेळ मिळाला आहे. सोन्याच्या भावात घसरण झाल्याने ग्राहकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. तसेच, नागरिकांचा चांगला प्रतिसाद बघून सराफ व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

58 हजार रुपये तोळे एवढा सोन्याचा दर काही दिवसांपूर्वी झाला होता. मात्र आता तो दर पुन्हा एकदा कमी झाला असून 52 हजार 500 रुपये पर्यंत आला आहे. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या घडामोडींमुळे सोन्याचा दर अजून वाढण्याची शक्यता असून येणाऱ्या काही महिन्यात तो दर 60 हजारापर्यंत देखील जाऊ शकतो, अशी शक्यता बाजारात व्यक्त करण्यात येत आहे.

 

 

 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!