केतकीचा पाय आणखी खोलात ! 2020 चे अट्रोसिटी प्रकरणी केतकी रबाळे पोलिसांच्या ताब्यात

464 0

नवी मुंबई- शरद पवार यांच्यावर फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणी वाढत आहेत. आता अट्रोसिटीच्या गुन्ह्यासाठी तिला रबाळे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून केतकी चितळे हे नाव सतत वादात आहे. केतकीने आतापर्यंत फक्त शरद पवार यांच्याबाबतच आक्षेपार्ह पोस्ट केली नाही तर तिने अशा अनेक वादग्रस्त पोस्ट केल्या आहेत. त्यामुळे केतकीवर आधीही अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याचे प्रकरण तिच्या चांगलेच अंगाशी आले आहे. कारण शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकीवर तब्बल 17 गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

आता आणखीन एक जुने प्रकरण पुन्हा समोर आले असून यामध्ये धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप तिच्यावर आहे. त्यामुळे केतकीचा पाय आणखी खोलात गेला आहे. केतकी चितळे हिने 1 मार्च 2020 रोजी फेसबुकवर एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये तिने म्हटले होते की, ‘ नवबौद्ध , 6 डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क’, आम्ही फक्त हिंदू, असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी !? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो , की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो” या पोस्ट प्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल झाला होता. आता पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपास सुरु केला आहे.

दरम्यान, केतकी चितळेच्या विरोधात फक्त ठाणे नवी मुंबईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे इतर ठिकाणचे पोलीसही केतकीचा ताबा मागत आहेत.

Share This News
error: Content is protected !!