अजित डोभाल यांच्या घरात घुसला अज्ञात व्यक्ती, रिमोटनं कंट्रोल केलं जात असल्याचा दावा

193 0

नवी दिल्ली – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या घरात एकानं घुसण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सुरक्षारक्षकांनी तातडीनं घरात घुसणाऱ्या अज्ञात व्यक्तीला तातडीनं ताब्यात घेतलं आहे. सध्या दिल्ली पोलिसांकडून त्या व्यक्तीची चौकशी सुरु आहे. नेमका हा व्यक्ती कोण आहे ? त्यानं नेमकं असं का केलं, याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही.

दिल्लीतील लोधी कॉलनीत असलेल्या स्पेशल सेलच्या ऑफिसात या व्यक्तीची कसून चौकशी सुरु आहे. आपल्याला रिमोटनं कंट्रोल केलं जात असल्याचा दावा केला असून आपल्यावर चीप लावण्यात आली असल्याचंही या इसमानं म्हटलं. त्याची तपासणी केली. त्यानंतर कोणत्याही प्रकारची चीप या व्यक्तीच्या शरीरावर आढळून आली नाही. ही व्यक्ती कर्नाटकच्या बंगळुरुतील राहाणारा असल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे.

कोण आहेत अजित डोभाल ?

अजित डोभाल हे 1972 सालचे आयबी अधिकारी आहेत. भारतीय गुप्तहेर म्हणून त्यांनी अनेक बड्या कारवाया केल्या आहेत. सात वर्ष ते पाकिस्तानमध्ये राहिले आहे. ऑपरेशन ब्लू स्टार, ऑपरेशन ब्लू थंडर यात अजित डोभाल यांची महत्त्वाची भूमिका होती. 1999 साली झालेल्या विमान अपहरणावेळी अजित डोभाल यांना सरकारच्या वतीनं मुख्य वार्ताहर बनवण्यात आले होते.

Share This News

Related Post

धक्कादायक : ‘या’ भाजप माजी आमदाराच्या बंगल्याच्या परिसरात आढळला अर्धवट पुरलेला मृतदेह; साताऱ्यात खळबळ

Posted by - December 31, 2022 0
सातारा : भाजपच्या माजी आमदर कांताताई नलावडे यांच्या बंगल्याच्या बागेत अर्धवट पुरलेला मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा…
Murder Video

Murder Video : तरुणीने लग्नाला नकार दिल्याने आरोपीकडून तरुणीची हत्या

Posted by - July 10, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही दिवसांपूर्वी एका तरुणीची तिच्याच प्रियकराने भर रस्त्यात चाकूने वार करून हत्या (Murder Video) केली…
Thackeray Group

Thackeray Group : ठाकरे गटाला मोठा धक्का! आदित्य ठाकरेंचा ‘हा’ विश्वासू सोडणार साथ

Posted by - June 29, 2023 0
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40आमदारांसह बंड केल्याने उद्धव ठाकरे यांना (Thackeray Group) मोठा धक्का बसला होता. यानंतर…

मुळशीत भूकंपाचे सौम्य धक्के ; 500 मीटर जमीन दुभंगली (पहा फोटो)

Posted by - July 19, 2022 0
पुणे : आज मुळशी धरण भागातील मौजे निंबाळवाडी आणि मौजे वडगाव वाघवाडी येथे सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाच्या…

Special Report : सावधान ! सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीशी चॅटिंग कराल तर सेक्सटॉर्शनचे व्हाल शिकार

Posted by - December 24, 2022 0
अनोळखी मेसेजेस, व्हिडिओ कॉल येत असतील तर सावधान… तुम्ही सेक्सटॉर्शनचे शिकार होऊ शकता. हल्ली तरुण-तरुणींपासून ज्येष्ठांपर्यंत अनेक जण या मायाजालात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *