गटनेतेपदी अजय चौधरीच ! विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची मान्यता, शिंदे गटाला धक्का

247 0

मुंबई- महाराष्ट्रात एकीकडे सरकार टिकवण्यासाठी सत्ताधाऱ्यांमध्ये खलबतं सुरु आहेत. तर दुसरीकडे पक्ष वाचवण्यासाठी शिवसेनेची धडपड सुरु झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेने कठोर पाऊल उचलत शिंदे यांची शिवसेना विधीमंडळ गटनेता पदावरून हकालपट्टी केली होती. त्यांच्या जागी विधानसभेचे आमदार अजय चौधरी यांची नियुक्ती केली होती. या निर्णयाला आता विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मान्यता दिली असल्याचे समजते आहे. यावर एकनाथ शिंदे गटाला न्यायालयात दाद मागावी लागणार आहे.

अजय चौधरी यांची गटनेतेपदी विधीमंडळच्या डायरीत नोंद झाली आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या आदेशाने ही नोंद केली गेली आहे. तर 12 आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत ऑनलाइन सुनावणी होणार आहे.

शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत नेमकी काय कारवाई होऊ शकते ?

विधानमंडळातील सूत्रांच्या माहितीनुसार

1) शिवसेनेकडून अपात्रतेबाबत विधानसभा उपांध्यक्षांकडे याचिका दाखल करण्यात आल्यानंतर आता विधानसभा उपाध्यक्ष त्या 12 आमदारांना नोटीस देऊ शकतात

2) आमदारांना नोटीस पाठवल्यानंतर विधानसभा उपाध्यक्ष नोटीसबाबत नेमकं त्या आमदारांचं काय म्हणणं आहे, याबाबत जाणून घेणार

3) कोरोनानंतरदेखील आमदारांना ऑनलाईन सुनावणी हवी आहे की राहू ते स्वतः याठिकाणी येऊन सुनावणीसाठी उपस्थित राहाणार हे ठरवलं जाणार आहे.

गुवाहटीत शिवसेना नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात; बंडखोर आमदारांचे मन वळवण्याचा प्रयत्न अपयशी

4) जर ते ऑनलाईन उपस्थित राहू इच्छित असतील तर त्यासाठी नॅशनल इनफॉरमेटिक सेंटरकडून देण्यात आलेल्या बँडविडथचा वापर करावा लागणार आहे. सध्याच्या परिस्थीती या बँडविडथची उपलब्धता पाहता दिवसाला केवळ 2 किंवा 4 आमदारांची सुनावणी पार पडू शकते.

5) ही अर्धन्यायिक प्रक्रिया आहे. यासाठी विशिष्ट वेळेची मर्यादा नाही माञ विधान भवनाच्या वतीने ही सुनावणी लवकरात लवकर पार पडावी यासाठी प्रयत्न होणारं आहेत

अजय चौधरी कोण?

अजय चौधरी हे शिवसेनेचे शिवडी विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. 2019 मध्ये विधानसभा मतदारसंघातून अजय चौधरी 40 हजार मताधिक्क्याने विजयी झाले होते. त्यांनी मनसेचे उमेदवार संतोष नलावडे यांचा पराभव केला होता. चौधरी हे परळ येथे वास्तव्यास आहेत. अजय चौधरी हे कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांच्या माध्यमातून पक्षावर ठाकरे कुटुंबाचीच मांड कायम राहावी यासाठी उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!