चीनचे बोईंग 737 विमान ग्वांगशी प्रांतात कोसळल्याचे वृत्त आहे. अपघाताच्या वेळी विमानात 133 जण होते असे सांगण्यात येत आहे. चीनच्या मीडियानुसार, दक्षिण चीन समुद्रात ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत किती लोकांचा मृत्यू झाला आणि किती जण जखमी झाले याची माहिती अद्याप मिळालेली नाही.
चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनीही विमानाच्या अपघाताला दुजोरा दिला आहे. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. चीनच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण प्रांतातील गुआंगशी येथे विमान कोसळले. ज्या भागात हा अपघात झाला त्या भागात भीषण आग लागली. अशा स्थितीत अपघातातील मृतांचा आकडा जास्त असू शकतो, असे मानले जात आहे.