Ahemdabad Plane Crash Update : उड्डाण घेतल्यानंतर 'त्या' शेवटच्या काही मिनिटात काय घडलं?

Ahemdabad Plane Crash Update : उड्डाण घेतल्यानंतर ‘त्या’ शेवटच्या काही मिनिटात काय घडलं?

745 0

Ahemdabad Plane Crash Update :  बोईंग 787 ड्रीमलाइनर हे एअर इंडियाचं विमान अहमदाबादमध्ये क्रॅश झालं.

विमानानं उड्डाण केल्यानंतर अवघ्या सात ते आठ मिनिटांमध्ये ते क्रॅश झालं. (Ahemdabad Plane Crash Update)

विमान क्रॅश होण्यापूर्वी पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोलला मेडे कॉल दिल्याची माहिती आहे.

GUJARAT PLANE CRASH: गुजरातमध्ये एयर इंडियाचं विमान कोसळलं; मोठी जीवितहानी
एअर इंडियाचं विमान बोईंग 787 ड्रीमलाइनर हे अहमदाबादमध्ये क्रॅश झालं..या विमानात 242 प्रवाशी होते.
दुर्घनेतील मृतांची नेमकी संख्या किती? याची माहिती काही वेळातच समोर येणार आहे.

विशेष म्हणजे हे विमान ज्या इमारतीवर कोसळलं ही इमारत सीव्हील हॉस्पिलटलची होती, अशी प्राथमिक माहिती आहे.

विमान क्रॅश होण्यापूर्वी पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोलला मेडे कॉल दिल्याची माहिती आहे.

हा मेडे कॉल हा एक धोक्याचा संदेश आहे.

AHMEDABAD PLANE PASSENGER FULL LIST: ‘त्या’ विमानात कोण-कोण ? प्रवाशांची नाव आली समोर

ज्यातून एअर ट्रॅफिक कंट्रोलला संकटाची जाणीव होत असते.

मेडे..मेडे..मेडे असा तीन वेळा हा मेसेज दिला जातो. परंतु काही क्षणांच हे विमान कोसळल्याने होत्याचं नव्हतं झालं.

विमान अपघाताची घटना अहमदाबाद इथल्या मेघनिनगर परिसराजवळ घडली, हा परिसर विमानतळाच्या जवळ आहे.

घटना घडल्यानंतर आपत्कालीन पथकांनी घटनास्थळी धाव घेतली.

VIJAY RUPANI: गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी लंडनला का निघाले होते? कारण आलं समोर
विमानाचे कॅप्टन सुमीत सबरवाल हे लाइन ट्रेनिंग कॅप्टन होते. त्यांना 8,200 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता. त्यांना सहाय्य करणारे फर्स्ट ऑफिसर क्लाइव कुंडर हे होते.

त्यांनाही 1,100 तासांचा उड्डाण अनुभव होता.
एअर ट्रॅफिक कंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार, विमानाने 13:39 वाजता रनवे 23 वरून उड्डाण केले. उड्डाणानंतर काही वेळातच, क्रूने मेडे कॉल दिला.

मात्र, त्यानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोलकडून केलेल्या संवादाला विमानातून उत्तर मिळालं नाही. उड्डाणानंतर लगेचच, विमान विमानतळाच्या परिघाबाहेर क्रॅश झाले.

एअर ट्रॅफिक कंट्रोल कर्मचाऱ्यांनी क्रॅश साइटवर मोठा धूर बघितला.

Share This News
error: Content is protected !!