राष्ट्रवादीपाठोपाठ भाजपात भाकरी फिरली! प्रदेश कार्यकारिणी जाहीर

1475 0

मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे असं सूचक विधान करत नुकताच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानंतर राष्ट्रवादीतून अनेक प्रतिक्रिया उमटत असतानाच भाजपच्या संदर्भात मोठी बातमी समोर आली असून भाजपची 47 जणांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेल्या या कार्यकारीतून माजी राज्यसभा खासदार आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांना डच्चू मिळाला असून माधव भंडारी यांच्यासह माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासह माजी राज्यसभा खासदार आमदार साबळे यांच्याकडे  प्रदेश उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली असून पुणे शहर भाजपाचे संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांना बढती देत त्यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!