Breaking News ! बॉम्बस्फोटाच्या मालिकेने काबूल हादरले, शाळा, ट्रेनिंग सेंटरमध्ये स्फोट, ८ मुलांचा मृत्यू

473 0

काबुल- अफगाणिस्तानची राजधानी काबूल बॉम्बस्फोटाच्या मालिकेने हादरून गेले आहे. शाळा, ट्रेनिंग सेंटरमध्ये एकापाठोपाठ स्फोट झाले असून यामध्ये ८ मुलांचा मृत्यू झाला आहे. काबूलमधील दश्त-ए-बरची भागात हा हल्ला झाला.

सुत्रांच्या माहितीनुसार शिया समुदायाला लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला. अब्दुर रहीम शाहिद हायस्कूलवर तीन ते पाच आत्मघातकी हल्लेखोरांनी हल्ला केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यापैकी दोन बॉम्बचा स्फोट झाला आहे. हा स्फोट झाला तेव्हा अनेक विद्यार्थी वर्गात होते. काबूलच्या पश्चिमेला मुमताज ट्रेनिंग सेंटरजवळ हा स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या हल्ल्यात किमान पाच जण जखमी झाले असून आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी माध्यमांना सांगितले. गृह मंत्रालयाने अब्दुर रहीम शाहिद हायस्कूलजवळ झालेल्या स्फोटाची पुष्टी केली.

Share This News
error: Content is protected !!