नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भारताने इतिहास (Aditya L1) रचला आहे. चांद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर भारताने सूर्य मिशनदेखील यशस्वी झाले आहे. भारताचं सूर्ययान आदित्य L1 ने अंतिम कक्षेत प्रवेश केला. आहे. शास्त्रज्ञांच्या या यशानंतर पंतप्रधान मोदींनी इस्रोचं कौतुक केलं आहे.
कधी झाले होते आदित्य L1 चे प्रक्षेपण
इस्रोने 2 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेसपोर्ट सेंटरवरून आदित्य-L1 नावाची भारतातील पहिली स्पेस-बेस्ड ऑब्झरर्वेटरी प्रक्षेपित केली होती. इस्रोच्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहनाच्या (पीएसएलव्ही-सी57) मदतीने आदित्य एल1चं प्रक्षेपण झालं होतं. आता हे यान ‘लॅग्रेंज पॉइंट 1 (L1) भोवती असलेल्या हॅलो कक्षेत या त्याच्या नियोजित स्थळी पोहोचलं आहे.
India creates yet another landmark. India’s first solar observatory Aditya-L1 reaches it’s destination. It is a testament to the relentless dedication of our scientists in realising among the most complex and intricate space missions. I join the nation in applauding this…
— Narendra Modi (@narendramodi) January 6, 2024
लॅग्रेंज पॉइंट नेमका काय आहे?
प्रत्येक ग्रहाजवळ असे काही पॉइंट असतात, जेथे त्या ग्रहाची गुरुत्वाकर्षण शक्ती अवकाशयानाची कक्षीय गती आणि सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती यांचे संतुलन साधले जाते. त्या ठिकाणी अवकाशयान स्थिर करून सूर्याच्या तेथून निरीक्षणे नोंदवणे, अभ्यास करणे शक्य असते. पृथ्वी आणि सूर्य यांच्या दरम्यान असे पाच पॉइंट निश्चित करण्यात आले आहेत. त्यांना लॅग्रेंज पॉइंट 1 ते 5 अशी नावे देण्यात आली आहेत.
आदित्य L1 अंतराळ कक्षात नेमके काय काम करणार?
‘आदित्य L1’ हे सौरमालेच्या दूरस्थ निरीक्षणासाठी आणि पृथ्वीपासून सुमारे 1.5 दशलक्ष किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘L1’ वर (सूर्य-पृथ्वी लॅग्रेंजियन पॉइंट) सौरवाऱ्यांचं प्रत्यक्ष निरीक्षण करण्यासाठी डिझाइन केलेलं आहे.सौर वातावरणातील गतिशीलता, सूर्याच्या कोरोनाची (सूर्याच्या वातावरणाचा सर्वात बाहेरील स्तर) उष्णता, सूर्याच्या पृष्ठभागावरील सौर भूकंप किंवा कोरोनल मास इजेक्शन, सौर भडक्याशी संबंधित क्रिया आणि त्यांची वैशिष्ट्यांचा अभ्यास करणे आणि पृथ्वीच्या जवळच्या जागेत हवामानाशी संबंधित समस्या समजून घेणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे इस्त्रोच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Sharad Mohol CCTV : शरद मोहोळ हत्या प्रकरणात समोर आले दुसरे CCTV फुटेज
Sharad Mohol : शरद मोहोळच्या हत्येबद्दल पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन दिली ‘ही’ महत्वाची माहिती
Sharad Mohol Murder : शरद मोहोळच्या हत्येपूर्वी नेमकं काय घडलं होतं? ‘ही’ महत्वाची माहिती आली समोर
Sharad Mohol : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळची गोळ्या घालून हत्या; CCTV फुटेज आले समोर
Pune News : शरद मोहोळ खून प्रकरणात ‘त्या’ दोन नामांकित वकिलांचा समावेश
Pune Crime : पुण्यात टोळीयुद्धातून आतापर्यंत कोणाकोणाची झाली हत्या?
Sharad Mohol Murder : शरद मोहळची हत्या कशी केली? पोलिसांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम
Sharad Mohol : शरद मोहोळची गेम गॅंगमधील ‘त्या’ साथीदाराने केली; कोण आहे ‘तो’ व्यक्ती?