हुबळीजवळ ट्रक आणि ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक, ८ ठार २८ जखमी

334 0

कोल्हापूर- हुबळी धारवाडच्या बायपासवर ट्रक आणि खासगी बस यांच्यात भीषण अपघात होऊन आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर 26 जण जखमी झाले आहेत. मृतांपैकी सहाजण कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील आहेत.

कोल्हापूर येथून हुबळीला निघालेल्या ट्रॅव्हल्स बसचा आणि तांदूळ भरून निघालेल्या लॉरीची समोरासमोर धडक बसून हा अपघात झाला. या अपघातात ट्रक चालक, वाहक आणिकही दोन जण तसेच बसमधील चार जणांचा मृत्यू झाला. या अपघातात २८ प्रवासी जखमी झाले असून त्यांना हुबळीच्या किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!