पालघर- भरलेल्या विटांचा ट्रक उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन मजुरांचा मृत्यू तर 5 मजूर गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात पालघर मनोर रस्त्यावर वाघोबा घाटात घडला. सर्व मजूर विटांनी भरलेल्या ट्रकवर बसलेले होते. क्षमतेपेक्षा जास्त विटांचे वजन झाल्याने हा ट्रक उलटल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळावरून जाणाऱ्या काही वाहनचालकांनी आपल्या गाड्या थांबवून त्या मजुरांना बाहेर काढले.
