ठळक बातम्यापुणे

एमपीएससीच्या पूर्व परीक्षेचा पेपर फुटल्याच्या निषेधार्थ ‘अभाविप’चे ‘पुंगी बजाव’ आंदोलन (व्हिडिओ)

पुणे- नागपूर येथील केंद्रावर एमपीएससीच्या पूर्व परीक्षेचा पेपर फुटल्याच्या निषेधार्थ आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने पुण्यात ‘पुंगी बजाव’ आंदोलन करण्यात आलं.

राज्यात पेपरफुटीच्या घटना वाढत असून सत्तेत असणारा महाविकास आघाडी सरकार हे महाविकास आघाडी सरकार नसून महाभकास आघाडी सरकार आहे अशा तीव्र शब्दात आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने पुण्यातील गुडलक चौकात आंदोलन केलं यावेळी अभाविपचे महाराष्ट्र प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री अनिल ठोंबरे व पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल उपस्थित होते.