मुंबई : काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकीय गणितांमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. एकीकडे शिवसेना कोणाची ? धनुष्यबाण कोणाचे ? असा मोठा वाद सुरू असतानाच पुन्हा एक मोठी बातमी समोर येते आहे . शिवसेनेनं संभाजी ब्रिगेड सोबत युती करणार असल्याचे घोषित केले आहे .
त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, उद्धव ठाकरे यांनी आज संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे पक्षाचे प्रवक्ते गंगाधर बनबरे तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या उपस्थित पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे . यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की , शिवसेनेत या लढवय्या सहकाऱ्यांचं मी स्वागत करतो . ” प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी समविचारी पक्षांनी व्यक्तींनी एकत्र येण्याची गरज आहे . आज शिवसेना सत्तेत नसताना संभाजी ब्रिगेड आमच्यासोबत आले, याचा मोठा आनंद आहे, सत्तेत असताना तर कुणीही साथ देऊ शकतात, मात्र शिवसेना आज संघर्ष करत असताना सोबत आले ते खरे लढवय्ये, तेच खरं शौर्य ” असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. पाहूयात काय म्हणाले उद्धव ठाकरे …