आपला महाराष्ट्रठळक बातम्याब्रेकिंग न्यूज

पालखी सोहळ्यासाठी 4 हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात

पुणे:- कोरोनामुळे तब्बल दोन वर्षानंतर पहिल्यांदाच पालखी सोहळा पूर्ववत होणार असल्याने हा सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. 

जगतगुरू तुकाराम महाराजांची पालखी 20 जून रोजी तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 21 जून रोजी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवणार आहे.

या पालखी सोहळ्यासाठी  शहरात ४ हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे २२ जून रोजी पुणे  शहरात आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून या पालखी सोहळ्यासाठी बंदोबस्ताचे खास नियोजन करण्यात आलं