पुण्यात आज संध्याकाळी अग्निशमन दलाकडे आगीच्या 3 घटना

103 0

पुणे – दिनांक २८•१०•२०२२ रोजी सायंकाळी सहानंतर आगीच्या ०३ घटना घडल्या असून सदर ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान वेळेत पोहोचल्याने धोका टळला असून जखमी वा जिवितहानी कोठे ही नाही.

आज सायंकाळी दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी अग्निशमन मुख्यालयात त्यांच्या कार्यालयातून अप्सरा थिएटरच्या दिशेला मोठ्या प्रमाणात धूर दिसत असल्याचे नियंत्रण कक्षात कळवताच तातडीने दोन अग्निशमन वाहने रवाना करण्यात आली होती. त्यावेळी तिथे नाल्यामधे मोठ्या प्रमाणात कचरा पेटून प्रचंड धुर झाला होता. अग्निशमन प्रभारी अधिकारी प्रशांत गायकर व जवानांनी आग पुर्ण विझवली.

तसेच सायंकाळी ०७•१२ वाजता हडपसर, चिंतामणी नगर, गल्ली क्रमांक ०४ येथे गादी कारखान्यात आग लागल्याची वर्दि मिळताच हडपसर व काळेबोराटे नगर अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले. घटनास्थळी सुमारे ६\७ कापसाच्या गाद्यांनी पेट घेतला होता. जवानांनी पाणी मारत आग विझवून पुढील धोका टाळला. अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनावणे व जवानांनी कामगिरी पुर्ण केली. आगीचे कारण समजू शकले नाही.

त्यानंतर लगेचच सायंकाळी ०७•१३ वाजता रविवार पेठ, तांबोळी मस्जिद जवळ, तारा मॉल येथे आग लागल्याची वर्दि मिळाली असता मुख्यालयातून एक फायरगाडी एक देवदूत वाहन, कसबा अग्निशमन वाहन व एक वाॅटर टँकर रवाना करण्यात आला होता. घटनास्थळी इमारत सात मजली असून टेरेसवर एसी डक्ट पॅनेलला आग लागून तिथेच असलेल्या रिकाम्या पाण्याच्या टाकीने पेट घेतला होता. जवानांनी पाणी मारत सुमारे दहा मिनिटात आग आटोक्यात आणत आग इतरञ पसरु न देता धोका टाळला असून यामधे कोणी जखमी नाही. आगीचे कारण समजू शकले नाही. तसेच अग्निशमन अधिकारी पंकज जगताप व प्रशांत गायकर व जवानांनी कामगिरी केली.

रविवार पेठ येथील आग शहराच्या विविध भागातून दिसून आल्याने नियंत्रण कक्षात असंख्य फोन आले तसेच “आग किती मोठी आहे व कोणी जखमी/जिवितहानी झाली का” अशी विचारणा अनेक नागरिकांनी केली. सदर ठिकाणी दलातील अँब्युलंस अटेन्डट व तेथील रहिवाशी असलेले प्रविण सिद्धे यांनी विषेश मदत करत अग्निशमन वाहन पोहोचण्याआधी व नंतर योग्य ते मदतकार्य करुन आपले कर्तव्य बजावले.

Share This News

Related Post

उपयुक्त माहिती : मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही ? तुमच्या प्रत्येक सूचनांना करतात दुर्लक्षित ; मग हि माहिती वाचाच

Posted by - January 25, 2023 0
एकाग्रता आपल्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावते. अभ्यासापासून ऑफिसच्या कामापर्यंत सगळीकडे एकाग्रता खूप महत्त्वाची असते. हेच कारण आहे की लहानपणापासूनच वडील…
Shri Tulshibag Ganapati

गणपती बाप्पा मोरया ! श्री तुळशीबाग गणपती आगमन सोहळा पहा टॉप न्यूज मराठीवर LIVE

Posted by - September 19, 2023 0
पुणे : ज्या लाडक्या बाप्पाची आपण वर्षभरापासून आतुरतेने वाट बघत असतो. तो बाप्पा आज विराजमान होत आहे. यंदाचा बाप्पाचा आगमन…

श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे निधन, पुण्यातील जहांगीर रुग्णालयामध्ये घेतला अखेरचा श्वास

Posted by - September 13, 2022 0
सातारा : श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे निधन झाले आहे. पुण्यातील जहांगीर रुग्णालयामध्ये त्यांनी अखरेचा श्वास घेतला. शिवाजीराजे भोसले हे…
Mansoon

4 जून रोजी भारतात दाखल होणार मान्सून; हवामान खात्याचा अंदाज

Posted by - May 31, 2023 0
पुणे : एल निनोच्या पार्श्वभुमीवर मान्सून तब्बल आठ दिवस उशीराने बंगालच्या उपसागरात दाखल झाला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *