ब्रेकिंग न्यूज ! १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी एटीएसकडून चौघांना अटक

431 0

मुंबई- मुंबईमध्ये १९९३ साली झालेल्या साखळी बॉंबस्फोट प्रकरणी गुजरात एटीएसने चौघांना अटक केली आहे. 1993 साली मुंबईतील विविध ठिकाणी 12 बॉंबस्फोट घडवण्यात आले होते. 257 लोक या बॉंबस्फोटात मारले गेले होते. 

सय्यद कुरेशी, शोएब कुरेशी उर्फ शोएब बाबा, युसुफ भटका, अबू बकर अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. या चौघांच्या चौकशीनंतर काही नवीन खुलासे समोर येण्याची शक्यता आहे. तीन महिन्यांपूर्वी ४ फेब्रुवारी रोजी परदेशातील एका मोठ्या ऑपरेशनमध्ये भारतीय एजेन्सीने मुंबई बॉंबस्फोट हल्ल्यातील मोस्ट वॉन्टेड आरोपी दहशतवादी अबू बकला यूएईतून अटक करण्यात आली होती .

Share This News
error: Content is protected !!