अयोध्या राज्यात झालेल्या अभूतपूर्व सत्तानाट्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील मंत्र्यांसह शिवसेनेच्या आमदार खासदारांसह अयोध्या दौऱ्यावर गेले असून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत.
त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट देखील एकनाथ शिंदे आज घेणार आहेत.
असा असेल मुख्यमंत्र्यांचा अयोध्या दौरा
दुपारी 12 वाजता श्रीरामाची महाआरती करणार
दुपारी 12.20 वाजता राम मंदिराच्या कामाची पाहणी करणार
दुपारी 2.30 वाजता मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद
दुपारी 3 अयोध्येतील लक्ष्मण किल्ल्याला भेट देणार
संध्याकाळी 6 वाजता शरयू नदीवर महाआरती
रात्री 9 मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची एकनाथ शिंदे भेट घेणार