Documents required for Kunbi certificate: मराठा आरक्षण आंदोलनाला यश आले, सरकारने हैद्राबाद गॅझेटला मान्यता दिली. या गॅझेटद्वारे अखेर आता मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. (Documents required for Kunbi certificate) सरकारने या गॅझेटचा अभ्यास करण्यासाठी वेळ मागितला आहे. पण जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत मराठा समाजातील जे लोक कुणबी जातीचा पुरावा देऊ शकतात, त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. हे प्रमाणपत्र कसे काढायचे जाणून घेऊया ?
CLIMATE CHENGE: मराठवाड्यात ३ दिवस पावसाचा अंदाज; ढगाळ हवामानाचा अंदाज
अर्ज कुठे करायचा?
कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज ‘आपले सरकार’ या अधिकृत सरकारी वेबसाइटवर www.aplesarkar.mahaonline.gov.in करायचा आहे. ऑनलाइन (Documents required for Kunbi certificate) अर्ज केल्यानंतर, अर्जाची पडताळणी तहसील कार्यालयात केली जाते आणि कागदपत्रांची तपासणी झाल्यावर उपविभागीय अधिकारी (Sub-Divisional Officer) अंतिम प्रमाणपत्र देतात. या संपूर्ण प्रक्रियेला साधारणपणे 21 ते 45 दिवस लागू शकतात.
कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे जोडावी:
* ओळखीचा पुरावा: अर्जदाराचे आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक.
* रहिवाशी पुरावा: रेशन कार्ड, लाईट बिल, फोन बिल, पाणीपट्टी किंवा घरपट्टी यापैकी कोणताही एक पुरावा.
* शैक्षणिक पुरावा: अर्जदार किंवा त्यांच्या रक्ताच्या नात्यातील नातेवाईकांचा शाळेचा दाखला (Leaving Certificate) किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट. या दोन्ही कागदपत्रांवर जन्म तारीख आणि जन्मस्थळ नमूद केलेले असणे आवश्यक आहे.
* महसुली पुरावा: उत्पन्नाचा दाखला, ७/१२ किंवा ८ अ उतारा.
* इतर कागदपत्रे:
* विहित नमुन्यातील अर्ज, ज्यावर १० रुपयांचा कोर्ट फी स्टॅम्प लावलेला असावा.
* अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो.
* १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर कुणबी जातीचा पुरावा सादर करावा लागेल.
PUNE TRAFFIC APP NEWS: पुणे ट्रॅफिक ॲप वापरून नागरिकही करू शकतात कारवाई
कुणबी जातीचा पुरावा कसा शोधायचा?
हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. कुणबी जातीचा पुरावा शोधण्यासाठी काही पर्याय आहेत:
* कोतवाल बुक किंवा ग्रामपंचायत नमुना १४: १ डिसेंबर १९६३ पूर्वीच्या कोतवाल बुकमध्ये किंवा (Documents required for Kunbi certificate) ग्रामपंचायतीच्या नमुना क्रमांक १४ मध्ये जन्म-मृत्यूची नोंद जातीसहित असते. यामध्ये तुमच्या पूर्वजांची कुणबी म्हणून नोंद आहे का, हे तपासता येते.
* तहसील कार्यालयातील नमुना ४: तुम्ही किंवा तुमच्या रक्ताच्या नात्यातील नातेवाईकांचा जन्म किंवा मृत्यू ज्या गावात झाला असेल, त्या तहसील कार्यालयात नमुना क्रमांक ४ च्या नक्कलेसाठी अर्ज करू शकता. यामध्ये कुणबी जातीची नोंद आहे का, हे तपासता येते.
* जुनी महसुली कागदपत्रे: आपल्या कुळातील जुन्या महसुली कागदपत्रांमध्ये, जसे की वारस नोंद, जमीन वाटप नोंदी, ७/१२ उतारे, ८अ उतारे, फेरफार, खरेदीखत, भाडेपट्टा, क.ड.ई पत्र, सोडपत्र, खासरापत्रक किंवा हक्कपत्रक, यामध्ये तुमच्या किंवा तुमच्या रक्ताच्या नात्यातील कोणत्याही नातेवाईकाचा कुणबी असा उल्लेख आहे का, हे शोधून तो पुरावा म्हणून सादर करू शकता.
हा पुरावा १३ ऑक्टोबर १९६७ पूर्वीचा असावा आणि तो तुमच्या रक्ताच्या नातेसंबंधातील व्यक्तीचा असल्यास ग्राह्य धरला जातो. तुम्ही तुमच्या वडिलांची, आजोबांची, पणजोबांची किंवा इतर कोणत्याही रक्ताच्या नातेवाईकांची वंशावळ तयार करून ती शपथपत्रासोबत जोडू शकता. वंशावळ जुळवण्यासाठी सर्व नातेवाईकांची नावे आणि त्यांचे संबंध स्पष्टपणे लिहा. शिंदे समितीने शोधलेल्या नोंदींच्या आधारे तयार केलेले शपथपत्र देखील अर्जासोबत जोडावे लागेल.
हे सर्व कागदपत्रे एकत्र करून, महाऑनलाईन पोर्टलवर अर्ज सादर केल्यास कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. यामुळे मराठा समाजाला आरक्षणाचे लाभ मिळण्यास मदत होईल.