DEEPFACKE DITECTION TOOL: सध्या जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा प्रभाव झपाट्याने वाढत आहे. त्यातही जेमिनीसारख्या AI प्लॅटफॉर्म्सच्या (DEEPFACKE DITECTION TOOL) माध्यमातून नवनवीन ट्रेंड्स तयार होत आहेत. यातून तयार होणाऱ्या खऱ्या-खोट्या इमेजेस आणि व्हिडिओजमुळे सायबर गुन्हे, फसवणूक, सामाजिक बदनामी यासारख्या घटनांमध्येही वाढ होत आहे. सामान्य माणसाला हे खरे आहे की खोटं, हे समजणं अवघड होत चाललं आहे. मात्र आता या समस्येवर तोडगा काढण्यासाठी भारत सरकारने एक अत्यंत उपयुक्त आणि प्रभावी टूल विकसित केले आहे.
मार्च 2025 मध्ये भारत सरकारकडून “वास्तव AI” हे नावाचे डीपफेक डिटेक्शन टूल अधिकृतपणे लाँच करण्यात आले. हे टूल पूर्णपणे मेड इन इंडिया असून, फसवणूक, बदनामी, आर्थिक घोटाळे, आणि चुकीची माहिती पसरवण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी तयार करण्यात आले आहे. AI आणि मशीन लर्निंगच्या साहाय्याने काम (DEEPFACKE DITECTION TOOL) करणारे हे तंत्रज्ञान सर्वसामान्य नागरिकांनाही सहज वापरता येईल असे डिझाइन करण्यात आले आहे.
“वास्तव AI” टूलची अधिकृत वेबसाईट देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. या वेबसाईटवर कोणीही आपल्या मोबाइल किंवा संगणकावरून फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करू शकतो. काही सेकंदांतच हे टूल त्या माध्यमाची सत्यता तपासून देते – म्हणजेच तो फोटो किंवा व्हिडिओ खरा आहे की बनावट, हे स्पष्ट होते.
आजकाल AI च्या साहाय्याने बनावट व्हिडिओज तयार करणे अगदी सहज झाले आहे. बऱ्याचदा हे व्हिडिओज इतके वास्तवदर्शी असतात की खोटं-खरं (DEEPFACKE DITECTION TOOL) ओळखणं कठीण होतं. अनेकदा सेलिब्रिटी, राजकारणी, बिझनेसमन, आणि अगदी सामान्य लोकदेखील अशा फेक व्हिडिओंचा बळी पडतात. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा क्लिप्समुळे वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर अनेक समस्या निर्माण होतात.
JALANA DHANGAR ANDOLAN | DEEPAK BORHADE| जालन्यातील बदनापूरात धनगर समाजाचा रास्ता रोको
“वास्तव AI” टूल हा या समस्येवरील अंतिम उपाय नाही, मात्र चुकीची माहिती आणि गैरसमज दूर करण्यासाठी, एखाद्या क्लिपबद्दल सत्यता पडताळून पाहण्यासाठी हे टूल एक विश्वासार्ह पर्याय ठरतो. जनतेमध्ये डिजिटल साक्षरता वाढवण्याच्या दिशेने हे एक मोठं पाऊल मानलं जात आहे. आजच्या डिजिटल युगात अशी टूल्स वापरणं ही काळाची गरज ठरत आहे. त्यामुळे कुठलाही फोटो किंवा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याची सत्यता पडताळण्यासाठी “वास्तव AI” सारख्या टूलचा वापर करणे, ही एक शहाणपणाची पावले ठरू शकतात.