राज्य सरकारचा मोठा निर्णय! महिला आणि बालकांसाठी नवी हेल्पलाईन सुरु करणार
मुंबई : राज्यात सत्तेत असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने महिला आणि बालकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार राज्यातील संकटग्रस्त महिला व बालकांना तातडीने आवश्यक ती माहिती व सहाय्य मिळण्यासाठी राज्य सरकारकडून नवी हेल्पलाईन सुरु करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या पावलावर पाऊल ठेवत मिशन शक्ती अंतर्गत 181 महिला हेल्पलाइन ही सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला