Meera Borwankar : पोलिसांच्या जमिनीचा ‘दादा’ मंत्र्यांनी लिलाव केला; IPS मीरा बोरवणकरांचे खळबळजनक दावे
पुणे : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर (Meera Borwankar) यांच्या जीवनावर आधारित मॅडम कमिश्नर हे पुस्तक प्रकाशित होत आहे. या पुस्तकात मीरा बोरवणकर यांनी अनेक धक्कादायक दावे केले आहेत. यामध्ये त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांच्या घरासाठीच्या जमिनीचा लिलाव करण्याचा निर्णय तत्कालीन पालकमंत्री दादांनी घेतला होता