Bhandara News : स्मशानभूमीत अंत्यसंस्कार सुरू असताना मधमाशांचा हल्ला
भंडारा : दोन दिवसांपूर्वी पुण्याजवळील राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना ताजी असताना आता भंडाऱ्यामधून अशीच मधमाशांच्या हल्ल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये स्मशानभूमीत मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार सुरू असतानाच अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या नागरीकांवर मधमाश्यांनी हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने नागरीकांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली. मोहाडी तालुक्यात येत असलेल्या हरदोली/झंझाळ या ठिकाणी ही घटना