Bank Holiday : ऑक्टोबरमध्ये 15 दिवस बंद राहणार बँका; RBI कडून यादी जाहीर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सप्टेंबर महिना संपत आला असून काही दिवसांनी ऑक्टोबर महिना (Bank Holiday) सुरू होईल. ऑक्टोबर महिन्यात अनेक विविध सण येणार आहेत. त्यामुळे तुमची अनेक कामे रखडण्याची शक्यता आहे. या महिन्यात बँकांना मोठ्या प्रमाणात सुट्टी असणार आहे. अशा परिस्थितीत बँकेशी संबंधित कोणतेही काम असल्यास ते त्वरित पूर्ण करा, अन्यथा तुम्हाला अडचणींना सामोरे