MP Girish Bapat : पुणे विमानतळावरून अधिक आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे सुरु करा ; केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे मागणी
नवी दिल्ली : पुणेकरांची वाढती मागणी विचारात घेता पुणे विमानतळावरून अधिक आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे सुरु करण्याची केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे खासदार गिरीश बापट यांनी आज मागणी केली. खासदार बापट यांनी सांगितले की पुणे ही भारतातील आठव्या क्रमांकाची महानगरीय अर्थव्यवस्था मानली जाते. देशातील सहाव्या क्रमांकाचे दरडोई उत्पन्न आहे. पुणे शहराच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला