Crop Insurance : शेतकऱ्यांना आता पिकाचादेखील काढता येणार इन्शुरन्स
मुंबई : भारत हा कृषिप्रधान देश आहे. आपल्या देशात शेती करणाऱ्यांची संख्या (Crop Insurance) मोठी आहे. वादळ, महापूर, अवकाळी पाऊस अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना अनेकवेळा नुकसान सहन करावे लागते. बऱ्याचदा त्यांना दुष्काळादेखील सामना करावा लागतो. हे नुकसान कमी व्हावं, यासाठी केंद्र सरकारने पीएम फसल बिमा योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी पिकाचा विमा उतरवू