Amol Mitkari : ‘बीडच्या बप्पाचा दादांना फोन’, अमोल मिटकरींच्या ‘त्या’ ट्विटची राजकीय वर्तुळात चर्चा
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ‘बीडच्या बप्पाचा दादांना फोन’ असं ट्वीट केल्याने खळबळ माजली आहे. अमोल मिटकरी यांचा इशारा शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणे यांच्याकडे असल्याचे समजत आहे. त्यांच्या या ट्विटची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. बीडच्या बप्पाचा दादांना फोन #मोठ्यामनाचादादा — आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी