बांधकाम परवानगीप्राप्त भूखंडास N.A ची गरज नाही; बिल्डरांना दिलासा
कोल्हापूर : कोणत्याही प्रकारच्या जमिनीवर बांधकामासाठी महापालिका, नगरपालिका किंवा ग्रामपंचायत क्षेत्रात निवासी क्षेत्रात परवानगी दिल्यानंतर त्यासाठी पुन्हा अकृषक परवानगीची (Permission) आता आवश्यकता राहणार नाही, असा महत्त्वाचा निर्णय राज्याच्या महसूल विभागाकडून (Department of Revenue) घेण्यात आला आहे. यामुळे आता आपल्याच जागेत बांधकाम करू इच्छिणाऱ्या सामान्य नागरिकांसह बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच अकृषक परवानगी देण्याचे