CM Eknath Shinde : मराठी मुलुखाच्या प्रतिभेची मोहर उमटवणाऱ्या कलावंताचा अभिमान ; ‘तानाजी-द अनसंग वॉरियर’ अजय देवगण ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

Posted by - July 22, 2022

मुंबई : ‘मनोरंजन क्षेत्रातील मानाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी मुलुखाच्या प्रतिभेची मोहर उमटवणाऱ्या कलावंताचा अभिमान आहे,’ अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कांरामध्ये बाजी मारणाऱ्या विविध श्रेणीतील चित्रपटांचे निर्माता, दिग्दर्शक, कलावंत आणि तंत्रज्ज्ञ आदींचे अभिनंदन केले आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्यावतीने आज ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

Share This News