VIDEO : मेदनकरवाडीत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची सुपारी देऊन हत्या; पतीसह तिचा खून करणाऱ्या तिघांना अटक
चाकण : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची एक लाख रुपयांना सुपारी देऊन हत्या करणाऱ्या पतीला तसेच सुपारी घेऊन तिचा खून करणाऱ्या तीन मारेकऱ्यांना चाकण पोलिसांनी अटक केली. चाकण पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या मेदनकरवाडी येथे ही धक्कादायक घटना घडली. आपली पत्नी आशा देशमुख बेपत्ता झाल्याची तक्रार गोरक्ष बबन देशमुख यानं 29 ऑगस्ट 2022 रोजी चाकण पोलीस ठाण्यात दिली