Pune News : पुण्यात संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती! मद्यधुंद बसचालकाने अनेक वाहनांना उडवले
पुणे : पुण्यात (Pune News) पुन्हा एकदा संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे. पुण्यात एका मद्यधुंद बसचालकाने प्रवाशांनी खचाखच भरलेली बस चक्क उलटी चालवत नेल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्याच्या सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पीएमटी बसमध्ये 50 प्रवासी