Chandrashekhar Azad Ravan : भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद रावण यांच्यावर जीवघेणा हल्ला
लखनऊ : भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्या (Chandrashekhar Azad Ravan) गाडीवर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे . उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथे त्यांच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला आहे. चंद्रशेखर आझाद (Chandrashekhar Azad Ravan) त्यांच्या गाडीने जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार केला आहे. चंद्रशेखर आझाद यांच्या कमरेला गोळी लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.