Moon Mission : 70 वर्षात 111 वेळा प्रयत्न फक्त 8 मोहिमा यशस्वी; जाणून घ्या जगभरातील चंद्रमोहिमांचा आतापर्यंतचा प्रवास?
मुंबई : ज्या क्षणाची प्रत्येक भारतीय वाट पाहतोय, तो क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 06 वाजून 04 मिनिटांनी चांद्रयान-3 चंद्रावर लँड (Moon Mission) होणार आहे. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी अवघ्या देशासाठी पाहिलेलं हे स्वप्न आता लवकरच सत्यात उतरणार आहे. चंद्रावर जाण्याचं स्वप्न अनेक देशांनी पाहिलं. चंद्रावर पाऊल टाकण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा