Ragging In Ghati Hospital : धक्कादायक ! घाटी रुग्णालयात 6 विद्यार्थ्यांचे रॅगिंग
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रात रॅगिंगविरोधात कठोर कायदा केला असला तरी अद्यापही काही महाविद्यालयात रॅगिंगच्या (Ragging In Ghati Hospital) घटना घडत असल्याचे समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात रॅगिंगचा प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. कनिष्ठ विद्यार्थ्यांची रॅगिंग केल्याप्रकरणी घाटी रुग्णालयातील तीन वरिष्ठ विद्यार्थ्यांना सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. त्याचबरोबर त्यांना 25 हजार रुपये